नांदेड(Nanded):- किनवट तालुक्यातील श्रीक्षेत्र उनकेश्वर गरम पाण्याच्या झर्याने प्रसिद्ध असलेले सर्वांग ऋषी आश्रमातील हेमाडपंथी शिव मंदिरात असलेली दानपेटी अज्ञात चोरट्याने उचलून नेऊन दत्त मंदिराच्या पाठिमागे गजाळीने फोडून भाविकांनी दानपेटीत २५ हजाराची रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. सदर चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेर्यात(CCTV camera) कैद झाला आहे.
श्री संस्थान उनकेश्वर येथील हेमाडपंथी शिव मंदिरात रात्रीला वॉचमन (Watchman) म्हणून काम करत असणारे पोचंना कटकामवार हे नेहमीप्रमाणे सकाळी उठून शिव मंदिरात(Shiva temple) गेले असता मंदिरात असलेली दानपेटी चोरी(Charity box theft) झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले.