औंढा नागनाथ (Hingoli) :- शहरातील नागेंद्र गल्ली भागातून मागील तीन महिन्यापूर्वी चांदीची देवीची मूर्ती चोरणाऱ्या चोरट्यास औंढा न्यायालयाने दोन वेगवेगळ्या कलमान्वये सात महिन्याचा सक्षम कारावासह चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली सदर खटला जलद गती न्यायालयात (Court)चालवण्यात आला त्यामुळे तीन महिन्याच्या कालावधीत झटपट न्याय देत येथील प्रथम वर्ग न्यायाधीशांनी आरोपीस करावासाची शिक्षा सुनावली.
देवीची दीड किलो वजनाची चांदीची मूर्ती चोरी
औंढा नागनाथ येथील संताबाई राजू गादेकर यांच्या देव घरातून धुरपत माय देवीची दीड किलो वजनाची चांदीची मूर्ती २२ ऑक्टोबर २०२४ रोजी मध्यरात्री चोरी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलीस अंमलदार महंमद शेख, ज्ञानेश्वर गोरे आदींनी शहरातील सिद्धार्थ नगर भागातील गोपनीय माहितीवरून पोलिसांनी नितीन नागनाथ मुळे यांच्या घरावर छापा मारला. त्यावेळी चोरीला गेलेली मूर्ती आढळून आली. परंतु आरोपी तेथून पसार होण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर सदर आरोपीला मुंबई (Mumbai)येथे एका गुन्ह्यात अटक असल्याची माहिती औंढा नागनाथ पोलिसांना मिळाली. १ नोव्हेंबर २०२४ रोजी औंढा पोलिसांनी आरोपीस मुंबई येथे अटक करून न्यायालयासमोर हजर केले. तेव्हापासून तो कारागृहात (prison) होता. त्यामुळे विशेष बाप म्हणून सदर खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात आला १० फेब्रुवारी २०२४ रोजी औंढा न्यायालयात याप्रकरणी सुनावणी करण्यात आली.
यावेळी सदर खटल्यात प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, तपासी अधिकारी महंमद अहमद शेख यांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राद्वारे हा गुन्हा घडल्याचे सिद्ध झाल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश शालन का. लोमटे यांनी नितीन नागनाथ मुळे याला चार महिने सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड तर तीन महिने सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड असा एकूण सात महिने सश्रम कारावाची तसेच दंड भरल्यास दोन महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अँड प्रताप उत्तमराव माने यांनी गुन्हा सिद्ध करण्यासाठी बाजू मांडली.