वर्धा(Wardha):- तालुका सेलू वरून मदणी या गावाकडे येणारे टिप्पर (Tipper)गाडी क्रमांक.MH 32 Q 4081 ही येत असताना सेलु तालुक्यातील टाकळी किटे फाट्या जवळ टिप्पर गाडीच्या चालकाचे अचानक नियंत्रण (Control) सुटल्याने गाडी सरळ रस्त्याचा साईटला असलेल्या निबाच्या झाडावर जाऊन आदळली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान (damage) झाले असून सुदैवाने यामध्ये चालकाला कुठलीही इजा झाली नसल्याने तो थोडक्यात बचावला. गाडी झाडाला आढळताच चालकांनी तिथून गाडी सोडून पळ काढला. गाडीचा अपघात बघण्याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.