परभणी/गंगाखेड(Parbhani):- तालुक्यातील झोला शिवारातील गोदावरी नदी पात्रातून विनापरवाना (without license) अवैधरित्या वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर गंगाखेड पोलीसांनी पकडून ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती.
अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील झोला शिवारातील गोदावरी नदी पात्रातून ट्रॅक्टर(tractor) च्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने दिनांक १६ मे गुरुवार रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टीपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसुफ पठाण, पोलीस हवालदार उमाकांत जामकर, चालक गजेंद्र चव्हाण, शिवाजी बोमशेटे, पोलीस अंमलदार संदीप गीते, पो. शि. शंकर गयाळ आदींनी झोला येथे गोदावरी नदी (Godavari River) पात्रात छापा मारून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर मिळून आल्याने हा ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आला.
याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल (Filed a case) करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. याचवेळी गोदावरी नदी पात्रामध्ये विविध ठिकाणी सुमारे २०० ते २५० ब्रास अवैध वाळूचा साठा मिळून आल्याने हा अवैध वाळू साठा पुढील कायदेशीर कार्यवाही करीता महसूल विभागाचा ताब्यात देण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने केलेल्या या कार्यवाहीमुळे वाळू तस्करांनी मध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.