गडचिरोली (Gadchiroli):- श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली व्दारा संचालित शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा चा इयत्ता १२ वी विज्ञान विभागाचा निकाल १०० % लागला असून , कला विभागाचा निकाल ९४.४४% लागला आणि एच.एस.सी. व्होकेशनल विभागाचा निकाल ९३.३३ % लागलेला आहे . विज्ञान विभागातून कु.तन्वी अनिल साळवे हिने ६८% गुण मिळवून शाळेतून प्रथम , त्याचबरोबर कु.याश्मिना वामन लांजेवार हिने ६७% गुण मिळवून व्दितीय , तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे कु.नलिनी गिरीधर सिंद्राम हिने ५९% व शुभम अरविंद सहारे ५९% गुण मिळवून तृतीय मिळवला आहे.
कला व विज्ञान शाखेत मुली झाल्या बाजीगर
कला विभागातून कु.अंजली तुळशीदास तुलावी हिने ७५.३३% गुण मिळवून शाळेतून पहिला क्रमांक मिळवला आहे तसेच व्दितीय मोनेश्वर कुंभकरण दुधकवर याने ६७.३३% गुण मिळवलेला आहे , तृतीय क्रमांक कु.अमिषा राजकुमार बारई हिने ६९.३३% गुण मिळवलेले आहे . एच.एस.सी. व्होकेशनल विभागातून(H.Sc. Vocational Division) दुशांत जितेंद्र सहारे याने ६६.८३% गुण मिळवून शाळेतून पहिला , केतनकुमार महेश बसोना याने ६५.८३% गुण मिळवून शाळेतून व्दितीय येणाचा मन मिळवला आहे , दीक्षित रुपेश वालदे ६५.६७% गुण व गीतेश वामन प्रधान याने ६५.६७ % मिळवून शाळेतून संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला आहे .
सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन उच्च शिक्षणाची कास धरावी
या निकालाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांनी समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील वाटचालीस सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन उच्च शिक्षणाची कास धरावी , आपला व आपल्या कुटुंबाचा व महाविद्यालयाचा नाव लौकिक करावा असे मत व्यक्त केले व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच सर्व पालकांचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या (Junior Colleges) यशाचे श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ , गडचिरोली चे अध्यक्ष श्री.अनिल पाटील म्हशाखेत्री , संस्थेचे सचिव श्री.गोविंदराव बानबले व शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा चे शाळा समिती अध्यक्ष अरुण पाटील मूनघाटे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या . गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार व विद्यालयाचे पर्यवेक्षक किशोर कोल्हे , प्रा.विजय मेश्राम , प्रा.स्वनिल खेवले , प्रा.कालिदास सोरते , प्रा.मनोज सराटे , प्रा.विवेक गलबले , प्रा.लीकेश कोडापे , विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) अनिल बांबोळे व सर्व प्राध्यापकांना दिले आहे.