Washim :- रिसोड मौजे गोभणी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या (Department of Agriculture) वतीने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत कृषिदेवता नैसर्गिक शेती मिशन शेतकरी उत्पादक गटाचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले तसेच प्लॅस्टिक ड्रम वाटप करण्यात आले, या प्रशिक्षण वर्गाचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना नैसर्गिक पद्धतीने शेती करणाऱ्यास प्रोसहित करणे. रासायनिक खतांचा वापर टाळून जमिनीची गुणवत्ता सुधारणे तसेच आरोग्यासाठी उपयुक्त आणि सुरक्षित अन्न उत्पादन करणे आहे.
या प्रशिक्षण वर्गाचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना नैसर्गिक पद्धतीने शेती करणाऱ्यास प्रोसहित करणे
प्रशिक्षण वर्ग तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले त्यांनी नैसर्गिक शेतीचे महत्व समजून सांगितले तसेच जैविक खतांची निर्मिती बायोडायनॅमिक कंपोष्ट खत(Biodynamic Compost Fertilizer),गांडूळ खत यांची तयारी व उपयोग याविषयी सविस्तर माहिती दिली प्रशिक्षणादरम्यान सहभागी शेतकऱ्यांना प्रत्याशिके करून दाखवून नैसर्गिक शेती पद्धती प्रभावीपणे कश्या राबविता येतील. हे शिकवले शेतकरी गटाच्या वतीने आयोजित प्रशिक्षण वर्गात नैसर्गिक शेतीसाठी महत्त्वपूर्ण तंत्रांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली या वर्गाची उद्दिष्ट शेतकऱ्यांना रासायनिक शेतीवर पर्याय म्हणुन जैविक पद्धतीचे शिक्षण दिले प्रशिक्षण दरम्यान कंपोस्ट खत तयार करण्याच्या विवीध पद्धती प्रत्यक्षात दाखवण्यात आल्या त्यांचा प्रमाणबद्ध वापर या संदर्भात माहीती दिली तसेच शेतीतील किड नियंत्रणासाठी प्रभावी उपयोग कसा करता येईल या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली तसेच कंपोस्ट तयार करण्यासाठी शेतातील कचरा आणि जैविक घटकांचा योग्य प्रकारे पुनर्वापर करण्याची पद्धत दाखवण्यात आली.
पुढील हंगामासाठी या पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त
प्रशिक्षण वर्गात उपस्थित शेतकऱ्यांनी या नैसर्गिक उपायबद्दल उत्सुकता दर्शविली आणि पुढील हंगामासाठी या पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा शेतीवरचा खर्च कमी करून उत्पन्न वाढण्याचा मार्ग मिळणार असल्याचे तज्ञांनी सांगितले शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून अधिक नफा मिळवण्यासाठी नैसर्गिक परिस्थितीचा अवलंब करण्याचे महत्त्व पटवून दिले याशिवाय नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून ठेवता येते आणि व्यवस्थापन सुधारते आणि पर्यावरणाला हानी पोहोचत नाही ही स्पष्ट केले. प्रशिक्षण वर्गात शेतकऱ्यांना प्रश्नउत्तर सूत्रामधून आपली शंका निवेदना करण्याची संधी मिळाली शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक शेतीसाठी हा उपक्रम शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यास व पर्यावरण संवर्धनासाठी मोठे योगदान ठरणार आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
प्रशिक्षणाचे प्रास्ताविक श्री मदन शिंदे कृषि सहायक यांनी केले प्रमुख मार्गदर्शक श्री रमेश जाधव कृषि पर्यवेक्षक,श्री संजय मांडवगडे तज्ञ प्रशिक्षक यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री दुर्गादास खोडवे पोलीस पाटील गोभनी यांनी केले तसेच अध्यक्ष दिपक सरोदे, सचिव रामेश्र्वर साबळे, लक्ष्मण साबळे सर, बाजीराव पाटील हरकळ, हनुमान साबळे, सीताराम साबळे,नामदेव चव्हाण, रामभाऊ हुले,विलास गिरी , दिपक साबळे आदी मोठया संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. नैसर्गिक शेती हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी योगदान ठरणार.