लातूर (Latur):- घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगारांना, 206 ग्रॕम सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशा 15 लाख 23 हजारांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. या कारवाईतून दरोडा, जबरीचोरी, घरफोडीचे 17 गुन्हे उघड झाले. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई (action)केली.
त्या परिसरात सापळा लावून दोन संशयित आरोपींना सोमवारी ताब्यात घेतले
याबाबत थोडक्यात माहिती की, जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला(police station) घरफोडी, दरोडा, जबरीचोरी करणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू होता. या पथकांना गुप्त बातमीदाराकडून घरफोडीतील गुन्हेगार चोरलेला सोन्याचा मुद्देमाल विकण्यासाठी अहमदपूर ते टेंभूर्णी रोडवर एका ब्रिजच्या खाली प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती मिळाली. त्यावरुन पथकाने अहमदपूर ते टेंभूर्णी जाणाऱ्या रस्त्यावरील त्या परिसरात सापळा लावून दोन संशयित आरोपींना सोमवारी ताब्यात घेतले.
पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी, दरोडा, जबरीचोरीचे गुन्हे
भारत गोविंद शिंदे उर्फ अशोक समिंदर शिंदे, (वय 45 वर्ष, राहणार बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी, सध्या राहणार मळाई पार्क, फुरसुंगी, हडपसर जिल्हा पुणे) व अविनाश किशन भोसले, (वय 23 वर्ष, नायगाववाडी तालुका नायगाव जिल्हा नांदेड) या दोघांकडे सोन्या-चांदीचे वेगवेगळे दागिने दिसून आले. त्याबाबत त्याच्याकडे विचारले तेव्हा त्याने त्याच्या इतर साथीदारासह मिळून लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी, दरोडा, जबरीचोरीचे गुन्हे केल्याचे व त्या गुन्ह्या मध्ये चोरलेला, त्याच्या हिश्याला आलेले सोन्या-चांदीच्या (silver and Gold))दागिन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम असल्याचे कबूल केले.
एकूण 17 गुन्हे दाखल!
लातूर जिल्ह्यात घडलेल्या घोरफोडीच्या गुन्ह्याच्या अभिलेखाची पाहणी केली असता नमूद आरोपीनी पोलीस ठाणे अहमदपूर येथील चार गुन्हे , पोलीस ठाणे वाढवना येथील चार गुन्हे , चाकूर पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे,पोलीस ठाणे किनगाव, उदगीर ग्रामीण, लातूर ग्रामीण व रेणापूर येथील प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण 17 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. चोरलेल्या 206 ग्राम सोन्याचे दागिने, 99 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम 35,000/- हजार रुपये रोख असा 15 लाख 23 हजार 192 रुपयाच्या मुद्देमालासह पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे वाढवणा यांंच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या फरार साथीदाराचा शोध सुरू आहे.