परभणी/जिंतूर(Parbhani):- तालुक्यातील जोगवाडा येथील प्राथमिक आरोग्य पथकातील कर्मचारी नेहमी गैरहजर राहत असल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आरोग्य पथक केंद्राला (Health Team Centers) कुलूप ठोकताच कर्मचारी हजर झाले. यावेळी डॉक्टर (Doctors)व इतर कर्मचाऱ्यांनी लेखी कारण देऊ असे आश्वासन गावकऱ्यांना दिल्यावर टाळे उघडण्यात आले
हा प्रकार सोमवार 2 डिसेंबर रोजी घडला आहे.
ग्रामस्थांनी आरोग्य पथकाचा लोखंडी गेटला लावले टाळे
जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मागील अनेक दिवसांपासून कोलमडली आहे. मध्ये ज्या डॉक्टरांना ग्रामीण भागात सेवा करण्याचे आदेश असताना ग्रामीण भागात वेळेवर न जाणे केवळ दोन ते तीन घंटे काम करणे असले प्रकार नेहमीच घटत आहेत. याकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे नेहमीच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार जोगवाडा येथील प्राथमिक आरोग्य पथक असलेल्या रुग्णालयात उघडकीस आला. यात सकाळी 10 वाजेपर्यंत डॉक्टर व इतर कर्मचारी कुणीच हजर नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य पथकाचा लोखंडी गेटला टाळे लावले, याची माहिती मिळताच आरोग्य पथाकाचे डॉक्टर व इतर कर्मचारी हजर झाले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी उशिरा येण्याचे कारण विचारले तर कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली दरम्यान उशिरा येण्याचे लेखी कारण देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामीण आरोग्य पथकाचे टाळे उघडले..!