पानगाव (Latur):- रेणापूर तालुक्यातील पानगाव- खरोळा फाटा महामार्ग रस्त्यासाठी तेरा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांच्या मागण्या प्रशासनाने अद्यापही मान्य केल्या नसल्याने आंदोलनकर्त्यांच्या समर्थनार्थ उद्या गुरूवारी (दि.२९) पानगाव ग्रामस्थ पानगाव येथे अर्धनग्न बोंबाबोंब आंदोलन करणार आहेत.
तहसिलदारांना निवेदनाद्वारे दिला इशारा
तसा इशारा निवेदनाद्वारे रेणापूर तहसीलदारांना देण्यात आला. हे निवेदने फॅक्सद्वारे पंतप्रधान(Prime Minister) नरेद्र मोदी(Narendra Modi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)व अजित पवार(Ajit Pawar), पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी, रेणापूर पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आले. यावेळीं गावातील ग्रामस्थ गोविंदराव नरारे, अनिल धर्माधिकारी, गुलाब चव्हाण, जगन्नाथ राचुरे, जनार्दन कलुरे, बालाजी श्रीहरी गुडे, सुधाकरराव बरुळे, राहुल मेटाडे, सुरज मोटाडे, शफीक पठाण, रमाकांत वाघमारे, युसुफोदिन सिद्धिकी, ज्ञानेश्वर कस्तूरे आदि उपस्थित होते.