शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा सहभाग
परभणी (Vanrai dam) : तालुक्यातील हिंगला येथे लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात जमिनीत पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे उभारण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. तालुक्यातील िंहगला येथ कृषी पर्यवेशक्षक बालाजी मुंढे, कृषी सहायक पी.बी. शिंगाडे, डहाळे, गरुड, अबुज, जोरगेकर आदींनी ग्रामस्थांशी चर्चा करुन त्यांना वनराई बंधार्याचे महत्व सांगितले. त्यामुळे ग्रामस्थां देखील संमती दर्शवत गावात वनराई बंधारा लोक सहभागातून उभारला. यावेळी सरपंच, पोलिस पाटील, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. गावात (Vanrai dam) वनराई बंधारा बांधण्यात आल्याने भविष्यात पाण्याचे संकट टळणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पाणी प्रश्न मिटणार..!
परभणी तालुक्यातील हिंगला येथील ग्रामस्थांशी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी संवाद साधला. गावात नेहमी होणार्या पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी,पाणी पातळीत वाढ होण्यासाठी वनराई बंधारे कसे उपयुक्त आहेत, याची माहिती दिली. कृषी पर्यवेशक्षक बालाजी मुंढे, कृषी सहायक पी.बी. शिंगाडे, डहाळे, गरुड, अबुज, जोरगेकर आदींनी ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांना देखील बंधार्याचे महत्व पटले. त्यामुळे गावात लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. या (Vanrai dam) उपक्रमात शालेय विद्यार्थ्यासह ग्रामस्थानी देखील सहभाग नोंदवला.