‘छावा’चे शेतकरी नेते विजयकुमार घाडगे यांचा इशारा
लातूर (Vijayakumar Ghadge) : गेल्या १४ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ८५०० रु. हमीभाव मिळावा व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या प्रमुख दोन मागण्यांसाठी शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील (Vijayakumar Ghadge) यांचे औसा तहसीलसमोर सुरू असलेले आमरण उपोषण राज्यकर्त्यांच्या वेळकाढूपणा धोरणाचा निषेध करीत मंगळवारी (दि.१) स्थगित करण्यात आले. पुढील भूमिका छत्रपती संभाजीनगर येथून ठरविण्यात येईल, अशी घोषणा घाडगे यांनी केली.
या आंदोलनावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे बारकाईने लक्ष होते. त्यांनीही वांरवार उपोषणकर्ते विजयकुमार घाडगे पाटील (Vijayakumar Ghadge) यांच्या तब्येतीची काळजी केली व हा शेतकऱ्यांचा लढा आपण अधिक तीव्र करु, असा विश्वास यावेळी दिला. तसेच शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर यांनीही या आंदोलनाला बळ देण्यासाठी येणाऱ्या काही दिवसात सोबत मिळून लढा देण्याचा विश्वास दिला.
यावेळी सल्लागार भगवान माकणे, लक्ष्मीकांत जोगदंड, मराठवाडा अध्यक्ष देवकरण वाघ, नांदेड जिल्हाप्रमुख माधव ताटे, लातूर जिल्हाप्रमुख दिपक नरवडे, जालना जिल्हाप्रमुख संदीप ताडगे, लातूर जिल्हाप्रमुख वि.आ.मनोज फेसाटे, नांदेड जिल्हाप्रमुख वि.आ. नितीन गिरडे, रमाकांत करे, मच्छिंद्र चिगुरे, संदीप किरडे, गणेश बरदाळे, मनोज लंगर, नितीन साळुंके, केशव पाटील, विकास वाबले, कैलाश शिंदे, विष्णु करे, सुदर्शन ढमाले, बालाजी माळी, शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे, राजीव भाऊ कसबे, बाजीराव एकुरगे, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.