वर्धा (Wardha) :- वयोवृद्धांना तीर्थ दर्शन घडावे या हेतूने राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री (Chief Minister) तीर्थदर्शन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांपैकी ८०० भाविकांचा जथ्था लवकरच अयोध्या येथे तीर्थ दर्शनासाठी पाठविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, लवकरच भाविकांचा जथ्था रवाना होणार
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची कार्यवाही समाजकल्याण सहाय्यक कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. याच कार्यालयाच्या माध्यमातून या योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविण्यात आले. देण्यात आलेल्या मुदतीत ४ हजार १६९ व्यक्तींचे अर्ज वर्धेच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाले. या प्राप्त अर्जाची छाननी केल्यावर ३ हजार ३५५ अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात आले. पहिल्या टप्प्यात पात्र लाभार्थ्यांपैकी १ हजार व्यक्तींना त्यांनी नोंदविलेल्या तीर्थदर्शनासाठी पाठविण्याचे निश्चित करून त्याबाबतचा प्रस्ताव पुणे येथील आयुक्त कार्यालयाला (Offices of the Commissioner) पाठविण्यात आला. संबंधित प्रस्तावावर सहानुभूती पूर्वक विचार होत ८०० भाविकांचा जथ्था लवकरच अयोध्या येथे पाठविण्याचे
निश्चित करण्यात आले आहे. शिवाय त्यासाठी आयआरसीटीसी साबतपूर्ण सोबत पुणे येथील आयुक्त पातळीवर करारही करण्यात आला आहे. लवकरच वर्ध्यातील संबंधित ८०० वयोवृद्धांची अयोध्या (Ayodhya) दर्शनाची इच्छापूर्ती होणार आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात या योजनेच्या लाभासाठी एकूण ४ हजार १६९ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ३ हजार ३५५ अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात आले आहे.