रिसोड-वाशिम (Washim): बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चोरी करताना महिला पकडली गेली. उपस्थित प्रवाशांनी (Passengers present) तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना ७ जून रोजी दुपारी १:०० वाजता रिसोड बसस्थानकात (Risod Bus Stand) घडली. पोलिसांनी महिलेविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.
चोरी करत असताना पकडली गेलेली महिला पैठण (Paithan) येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. सदर महिला चोरी करण्याचे उद्देशाने प्रवाशांचे बॅगमध्ये हात घालत असल्याचे काही प्रवाशांचे निदर्शनास आले .या प्रकरणाची चर्चा होताच उपस्थित प्रवाशांनी विशेषत: महिलांनी तिच्याकडे येऊन चांगलाच चोप दिला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस कर्मचारी (Police personnel) घटनास्थळी पोहोचले व त्यांनी महिलेस ताब्यात घेतले.