हिमायतनगर(himayatnagar) :- हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या गणेश विठ्ठलराव सावते व्यक्तीचा मृतदेह (Deadbody)एका लिंबाच्या झाडाखाली सापडल्याची घटना दिनांक ३ जुन रोजी घडली.
सोनारी येथील एका हॉटेलमध्ये वाळकी बुद्रुक येथील गणेश विठ्ठलराव सावते नावाचा व्यक्ती मागील काही महिन्यांपासून काम करुन उदरनिर्वाह(sustenance) करत असे. दरम्यान त्याचा मृतदेह दिनांक ३ जुन रोजी मध्यरात्री सोनारी फाटा जवळील एका शेतातील लिंबाच्या झाडाखाली सापडला असून मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. याबाबत गावकऱ्यांनी ताबडतोब पोलीस पाटील गजानन महामुने यांना तसेच हिमायतनगर पोलीसांना माहिती दिली असता पोलीस निरीक्षक शरद जराड यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार अशोक सिंगनवाड, नितीन राठोड यांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला.