कारंजा(washim):- भरधाव कारने धडक दिल्याने 22 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू (Death)झाला. ही घटना कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे गुरुवारी 20 जून रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. मो. फारुख अ . रऊफ वय 22 वर्ष असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून, तो कामरगाव येथील रहिवासी होता.
प्राप्त माहितीनुसार, एक कार भरधाव वेगाने कारंजाकडून अमरावतीच्या(Amravati) दिशेने जात असताना रस्ता ओलांडत असलेल्या युवकाला कारने जबरदस्त धडक दिली . त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्याला कामरगाव ग्रामीण रुग्णालयात (Rural hospitals)दाखल करण्यात आले .परंतु तपासणी दरम्यान तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .दरम्यान ,अपघात घडविण्यास कारणीभूत ठरलेली कार लोणी पोलिसांनी(Police) ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनेच्या पोलिसातील नोंदीबाबत मात्र तपशील प्राप्त झाला नाही.




