परभणी(Parbhani) :- येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयात चोरी झाल्याचे सोमवार २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास उघडकीस आले. या प्रकरणी अज्ञात चोरटयावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६४ हजार रूपयांचे साहित्य नेले चोरून
अतिख अहेमद यांनी तक्रार दिली आहे. २० सप्टेंबरच्या सायंकाळी ६.३० ते २३ सप्टेंबरच्या सकाळी ९.३० दरम्यान अज्ञात चोरट्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या (Grievance Redressal Commissions) कार्यालयात दार तोडत प्रवेश केला. कार्यालयामधून प्रिंटर(Printer), युपीएस(UPS), बॅटरी, संगणक(Computer) असे एकूण ६४ हजार रूपयांचे साहित्य चोरून नेले. चोरी झाल्याचे लक्षात आल्याने नवा मोंढा पोलीसात तक्रार देण्यात आली आहे. तपास पोउपनि.गाडेकर करत आहेत.