पुसद (HP Gas Agency) : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आरेगाव शेत शिवारातील एचपी गॅस एजन्सीच्या (HP Gas Agency) गोडाऊन मधून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 75 खाली सिलेंडर चोरून नेल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल अशोक जयस्वाल रा. सप्तपुर्तीनगर पुसद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एचपी गॅस एजन्सी चे संचालक पुसद माहूर रोडवरील आरेगाव फाटा पासून एक किलोमीटर अंतरावर त्यांचे शेत सर्वे नंबर 30 पैकी 2(ब ) मध्ये एचपी गॅस एजन्सी चे गोडाऊन आहे.
मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गोडाऊन मधील 75 खाली सिलेंडर प्रति सिलेंडर बावीसशे रुपये एकूण एक लाख 65 हजार रुपयांचे चोरून नेले. (Pusad City Police) पुसद येथील बस स्टँड समोर एचपी गॅस एजन्सी चे शॉप असून अतिरिक्त सिलेंडरचा लागणारा साठा हा गोडाऊन मध्ये ठेवण्यात येतो. (HP Gas Agency) गोडाऊन मध्ये घरगुती व व्यावसायिक असे मिळून एकूण सोळाशे चाळीस सिलेंडर कुलूप बंद होते. तर वॉल कंपाऊंड मध्ये व्यवसायिक व घरगुती खाली व भरलेले 300 सिलेंडर ठेवलेले होते.
याची सुरक्षा करण्याकरिता त्याठिकाणी चौकीदार सोनू दत्तराव जाधव हा नेमलेला आहे. मात्र चौकीदार रात्री त्याच्या खोलीमध्ये झोपलेला असताना सदर घटना घडली. 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता गोडाऊन मॅनेजर जीवन विलास जाधव रा आरेगाव यांनी (HP Gas Agency) गोडाऊनचा साठा चेक केला असता. त्यामध्ये 81 सिलेंडर कमी भरत होते. इकडे तिकडे शोधाशोध केली असता गोडाऊनच्या पाठीमागील भागात सहा सिलेंडर मिळून आले. तर 75 सिलेंडरची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली.
या आशयाच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 631/ कलम भारतीय न्याय संहिता ( बी एन एस )2023- 303,(2) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास (Pusad City Police) शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार बाबुराव पवार पोलीस कॉन्स्टेबल आकाश हे करीत आहेत.