हिंगोली (Hingoli) :- सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे महावितरणाच्या लघुदाब विद्युत वाहिनीवर (electrical conduit) आकडे टाकुन वीज चोरी केल्या प्रकरणी २० जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात वीज अधिनियमातंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
जिल्ह्यातील पाचही तालुक्यात वीज चोरी उघड
अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आकडे टाकुन वीज चोरी केली जात असल्याने महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेनूसार जिल्ह्यातील पाचही तालुक्यात वीज चोरी उघड केली जात आहे. त्या निमित्ताने सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे महावितरणाच्या पथकाने केलेल्या पाहणी दरम्यान काही जणांनी महावितरणाच्या लघुदाब विद्युत वाहीनीवर कोणतीही परवानगी न घेता आकडे टाकुन वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले.
२० जणांवर कलम १३५ वीज अधिनियम २००३ अन्वये गुन्हा दाखल
त्यावरून २४ जानेवारीला महावितरणाचे सहाय्यक अभियंता सत्यनारायण वडगावकर यांनी सेनगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विजय मारोती इंगळे, नागनाथ देवसिंग वैराट, विश्वास काशिनाथ हमाने, संतोष पांडुरंग देशमुख, लता सुरेश रेडगे, माधव भिमराव टोंचर. मिलींद सिताराम इंगोले, कुंडलिक इंगोले, संतोष सु देशमुख, ज्ञानेश्वर किसन काबळ शामसुंदर गंगाधर इंगळे, सुर्यभान बबन इंगोले, अशोक जिवाजी वाघमारे, मनोज धर्मराज देशमुख, सुनिता गजानन वांगणे, समाधान जगन्नाथ हमाने, मारोती गजानन दिनकर, दशरथ भिकाजी कातडे, विकास दामोधर चिंतलवाद, केशव धोंडुजी भांबाडे रा. कडोळी या २० जणांवर कलम १३५ वीज अधिनियम २००३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास गोरेगाव पोलिस करीत आहेत.