चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल!
आखाडा बाळापूर (Theft) : आखाडा बाळापूर येथील पोलीस स्थानक अंतर्गत येहळेगाव तुकाराम येथे एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहे.यात जवळपास 54 हजार रूपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. सदर प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल (Filing a Case) करण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 17 आक्टोबंर रात्री दहा ते 18आक्टोबंर पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान येहळेगाव तुकाराम येथे शेतकरी नथू हरीभाऊ काळे,विजय अंबादास सोनवणे,गजानन परसराम टेकाळे, व भुजंगराव दुलाजी कंठाळे या चौघांच्या येथे एकाच रात्री चोरी होउन रोख 42हजार रुपये,12हजार चांदीचे दागिने असे 54 हजार मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला याबाबत आज नथू हरीभाऊ काळे फीर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध आ.बाळापूर पोलीस स्थानकात (Akhara Balapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, पोलिस उपनिरीक्षक गणेश गोटके पोलीस पथकाने भेट दिली.
ऐन दिवाळीच्या तोंडावर चोऱ्या झाल्याने झोप उडाली!
ऐन दिवाळीच्या तोंडावर येहळेगाव तुकाराम येथे एकाच रात्री चार ठिकाणी धाडसी चोरीच्या घटना घडल्या यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ चोरी तपास लाउन ग्रामीण भागात रात्री गस्त मारण्याची मागणी या भागात होत आहे. रात्री या भागात बहुतांश वेळ पोलीस गस्त नावालाच असते अस या भागातील नागरिकांनी सांगितले.