हिंगोली(Hingoli):- कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे चोरीच्या घटना (incidents of theft) सुरूच असुन शुक्रवारी रात्री दोन ठिकाणी चोरी झाली घरातील मंडळी बाहेरगावी गेल्यान चोरीचा प्रकार उशिरा लक्षात आला सदर प्रकरणी तक्रार अर्ज देण्यात आला परंतु गुन्हा मात्र दाखल झाला नव्हता.
चोरटे तोंडाला बांधून घरात शिरून चोरी केली असल्याच आढळून आले
याबाबत प्राप्त माहीतीनुसार येथील रामनगर भागात मुख्याध्यापक अरविंद मगर व शिक्षक गणेश शिंदे हे राहतात सदरील दोघे उन्हाळी सुट्टी आसल्याने कुटुंबासह घराला कुलुप लावून गावाकडे गेले होते. यापैकी एक शिक्षक दुसऱ्या दिवशी रात्री परत आले असता तेव्हा त्यांना आपल्या घरात चोरी झाली असल्याच दिसून आले. तेव्हा त्यांनी बाजूला आसलेला सीसीटीव्ही (CCTV) तपासणी केली. चोरटे तोंडाला बांधून घरात शिरून चोरी केली असल्याच आढळून आले. तर येथून ते बाजूला शिक्षकाच्या घरी गेले असल्याचं दिसून आले. तेव्हा त्यांनी बाजूला घराची पाहणी केली आसता मुख्य दरवाजा कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील साहित्य अस्तव्यस्त फेकून रोख 21 हजार व काही ऐवज लंपास केला. पोलिसांना माहिती दिली असता त्यांनी पाहणी केली. या चोरीत नेमका किती ऐवज गेला ते स्पष्ट झाले नाही. चोरीच्या सतत घटना घडत आसल्याने रात्री सगळ्या भागात गस्त वाढविण्यासाठी पावले उचलली पाहिजे असं नागरिक अपेक्षा व्यक्त करत आहेत.
यापूर्वी झाली धाडसी चोरी
आखाडा बाळापूर येथे घर बंद आसलेला हेरून चोरी करण्यात येत आहे पंधरा दिवसापूर्वी शिक्षक कॉलणीत उपप्राचार्य डॉ. माधवराव मोरे यांच्या येथे चोरट्यांनी चोरी करून रोख 2लाख 48 हजार लंपास केले याचरात्री तलाठी भवन येथे तलाठी आर.डी.गीरी निवासस्थानी एलईडी टीव्ही(LED TV), तेलाचा डबा सह 20 हजार रूपयाचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते या चोरीचा तपास लागला नसताना इतर चोरी घटना सुरु आहेत