परभणी (Parbhani) :- जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के कोट्यांतर्गत मोफत प्रवेश मिळविण्यासाठी प्रक्रिया राबविली जाते. या प्रक्रियेंतर्गत २०६ शाळांमध्ये शुक्रवार ९ ऑगस्ट या अंतिम तारखेपर्यंत १ हजार २५३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ७४८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत तर ४९२ विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या (Department of Education) वतीने देण्यात आली.
५ शाळांत ५४ जागांसाठी ४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर १४ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रकियेंतर्गत जिल्हाभरात २०६ शाळांनी नोंदणी(Registration) केली होती. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील २९ शाळांमध्ये ११८ जागांसाठी ५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर ५९ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. जिंतूर तालुक्यातील १५ शाळांमध्ये ६१ जागांसाठी १९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. मानवत तालुक्यातील १२ शाळांत ६० जागांसाठी ३३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर २७ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. पालम तालुक्यातील ५ शाळांत ५४ जागांसाठी ४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर १४ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत.
४९२ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी
परभणी ग्रामीण ५६ शाळांत ३६६ जागांसाठी १८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर १७५ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. परभणी शहर ३७ शाळांत २१६ जागांसाठी १३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर ८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. पाथरी तालुक्यातील ९ शाळांत २८ जागांसाठी ७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर २१ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. पूर्णा तालुक्यातील १६ शाळांत ५८ जागांसाठी ३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर २५ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. सेलू तालुक्यातील १६ शाळांत १२८ जागांसाठी ९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर ३० विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत व सोनपेठ तालुक्यातील ११ शाळांत १६४ जागांसाठी १३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर २७ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. तर परभणी ग्रामीण मध्ये २ प्रवेश कार्यालय स्तरावर देण्यात आले. तर एकूण २०६ शाळांसाठी १ हजार २५३ जागांसाठी ७४८ प्रवेश पूर्ण झाले आहेत. व ४९२ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. १५ विद्यार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आले.