छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नेताजी सुभाष चंद्र बोस चौक रास्ता
पुसद (Pusad Road Work) : गेल्या सहा-सात महिन्यांपासून रखडलेल्या दैनिक देशोन्नतीच्या दणक्याने सदरच्या रस्त्याच्या कामाने वेग धरल्यानंतर मात्र या रस्त्याच्या कामामध्ये अजूनही मोठे अडथळे निर्माण होत आहेत. नेताजी सुभाष चंद्र बोस चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने जुना रस्ता खोदून गिटटा अंथरून तीन लेयर चे डांबरीकरण करण्यात येत आहे.
मात्र जसजसा या कामाने वेग धरला तसा या कामात मध्ये अडथळ्यांची मालिका सुरू झालेली दिसत आहे. अगोदरच हे काम अत्यंत रखडले. यामुळे नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागला. सणासुदीच्या काळात हा (Pusad Road Work) रस्ता उघडलेला होता. दैनिक देशोन्नतीने वारंवार वृत्त प्रकाशित करून व कॅमेरा लेन्सच्या माध्यमातून तर सामाजिक कार्यकर्ते अशोक बाबर यांनी स्वतः याकडे लक्ष देऊन प्रशासनाचे लक्षवेधले होते.मात्र आता कंत्राटदारांनी या कामास गती दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनावश्यक असलेला विद्युत खांब तर सार्वजनिक व नगरपरिषदेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्या अतिक्रम धारकांनी आक्षेप घेतल्यामुळे हा रस्ता वादाच्या भौऱ्यात सापडतो की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या गंभीर बाबीकडे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस व (Pusad Road Work) सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश झळके यांनी आता लक्ष देणे गरजेचे आहे हे विशेष. तर दैनिक देशोन्नती मध्ये दोन डिसेंबर रोजी वार्ता पत्रातून अतिक्रमणाकरिता प्रशासनाचे लक्ष वेधले होते. शासकीय जागेवरील नगरपरिषद अंतर्गत असो व सार्वजनिक बांधकाम अंतर्गत असो अतिक्रमण उठलेच पाहिजे तरच नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता मोकळा मिळेल हे विशेष.