वसमत(Hingoli):- वसमत येथील तालुका कृषी कार्यालयातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे तालुका कृषी अधिकारी (Agricultural Officer) आणि मंडळ कृषी अधिकारी यांच्यात बैठकीतच हाणामारी झाल्याची घटना घडली आहे या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांच्या तक्रारीवरून कुरुंदा मंडळ कृषी अधिकारी यांच्या विरोधात वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघात आठ दिवसात वाद होण्याची ही दुसरी घटना आहे, हे विशेष जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार दिल्यापासून वादाची ठिणगी पडली असल्याचे वृत्त आहे.
फायबरची खुर्ची उचलून फेकून मारली व वीट घेऊन मारण्याची धमकी दिली
वसमत शहर पोलीस ठाण्यात 31 मे रोजी रात्री उशिरा तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे त्यांनी तक्रार दिली की, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी कुरुंदा मंडळाचे मंडळअधिकारी ज्ञानेश्वर सायलू सुरशेटवाड यांना जलयुक्त शिवार योजनेचे अंदाजपत्रक तयार करून सादर करण्याची सूचना केली त्यावरून राग आल्याने मंडळ अधिकारी सुरेश शेठ वाढ यांनी बसलेली फायबरची खुर्ची उचलून फेकून मारली व वीट घेऊन मारण्याची धमकी दिली, फायबरची खुर्ची(fiber chair) मोडून 500 रुपयाचे नुकसान केले असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
शेतकऱ्यांसाठी असलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय अधिकाऱ्यांसाठी कुरण ठरत
या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर सायलू सुरशेटवाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शेख हकीम करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा कारभार या प्रकाराने चव्हाट्यावर आला आहे विशेष म्हणजे तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी यांच्यात आठ दिवसापूर्वीच प्रचंड वादावादी झाली होती. 28 मे रोजी दोन मंडळ कृषी अधिकारी यांनी प्रक्षेत्र भेट व शेतकरी प्रशिक्षण (Farmer training) यात झालेल्या कारभारावरून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करून भांडाफोड करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरच वादाची ठिणगी पडली आणि प्रकरण मारामारी पर्यंत पोहोचले असल्याचे आता समोर येत आहे. जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे गेल्यानंतरही वरिष्ठ अधिकारी वसमत येथील कारभाराकडे दुर्लक्ष करत असल्याने गोंधळाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय अधिकाऱ्यांसाठी कुरण ठरत आहे.
कृषी अधिकारी कार्यालयाचा अनागोंदी कारभार चर्चेचा विषय झाला
वसमत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा अनागोंदी कारभार चर्चेचा विषय झाला आहे. शेतकऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन अधिकारी करत नाहीत तालुका कृषी अधिकारी स्वतःच मुख्यालयी राहत नाहीत, त्यामुळे इतर कर्मचारी अधिकारी त्यांचा कित्ता गिरवतात शेतकऱ्यांना योजनेचा लाभ न देता बोगस विले उचलण्याचा धक्कादायक प्रकारही तालुका कृषी अधिकारी कार्यालयात घडत असल्याच्या चर्चा आहेत. योजनेचा लाभ देण्यासाठी ही शेतकऱ्यांना अडवणूक होते. दलालांच्या माध्यमातून कामे होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावरूनच अधिकारी कर्मचाऱ्यात वादाची ठिणगी प्रकरण हाणामारी पर्यंत जात आहे. आता अधिकाऱ्यातच हाणामारीचे घटना घडल्याने वरिष्ठ अधिकारी याची कशी दखल घेतात, प्रक्षेत्र भेट व शेतीशाळा या संदर्भात आलेल्या तक्रारीची चौकशी होते किंवा कसे हे पाहणे रंजक ठरणार आहे.