परभणी (Parbhani):- क्लासमध्ये बसण्यावरून बाचाबाची होत वाद झाला होता. सदरचा वाद क्लास व्यवस्थापनाने सोडविला. संबंधिताचा माफीनामा लिहून घेतला. दुपारी झालेल्या याच वादाचा राग मनात धरत सायंकाळी ७.३० च्या सुमारास दोघांना चाकूने(Knife) भोसकून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना मंगळवार २५ जून रोजी जिंतूर रोडवरील सुर्यवंशी कॉम्पलेक्स येथे घडली. या प्रकरणी तिघांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात (Police station)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिंतूर रोडवरील घटना तिघांवर गुन्हा दाखल
या घटने विषयी अधिक माहिती अशी की, पृथ्वीराज कल्याण यांनी तक्रार दिली आहे. काही युवकांचा क्लासमध्ये बसण्यावरून वाद झाला होता. सदरचा वाद मिटविण्यात आला. संबंधित युवकांकडून माफीनामा (apology)देखील लिहून घेण्यात आला होता. याच वादाचा राग मनात धरत आरोपींनी फिर्यादी व आणखी एकाला चाकूने वार करून गंभीर जखमी केले. तसेच सुर्यवंशी कॉम्पलेक्स मधून खिडक्यांची काच फोडून दहा हजार रूपयांचे नुकसान केले. जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी गणेश राजू शिंदे, त्याचा मामा रेहान नामक युवकाचा भाऊ या तिघांवर नानलपेठ पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोउपनि पवार करत आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख, पोलीस निरिक्षक चितांबर कामठेवार , पोशी सानप व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट दिली.