गडचिरोली (Gadchiroli):- पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातील निवडणुका आटोपल्याबरोबर काँग्रेस पक्ष (Congress party) ॲक्शन मोडवर आला असून निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू व सहप्रभारी कुमार रोहित यांनी एका पत्राद्वारे पूर्व विदर्भातील युवक काँग्रेसच्या दोन जिल्हाध्यक्षांना निलंबित केले आहे.
इंडियन युथ काँग्रेस (Indian Youth Congress)व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन न करता व युथ काँग्रेस च्या कोणत्याही मोहिमेमध्ये सहभागी होत नसल्याचे कारण देत या दोन जिल्हाध्यक्षांना निलंबित करण्यात आल्याचे पात्रात म्हटले आहे. निलंबित करण्यात आलेल्या जिल्हाध्यक्षांमध्ये नागपूर ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मिथिलेश कान्हेरे तसेच गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम यांचा समावेश आहे.