राज्यभरात मोटारसायकलची चोरी पाच दुचाकी जप्त
परभणी (Parbhani Crime) : राज्यभरात दुचाकी चोरी करणार्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. संबंधिताजवळून चोरीच्या पाच दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. चोरट्याने इतर साथीदारांच्या मदतीने दुचाकी लंपास केल्या होत्या. स्थागुशाच्या पथकाने सापळा रचुन शिताफिने कृष्णा बालासाहेब होंडे याला ताब्यात घेतले. त्याने विशाल उत्तम कोळसे, मार्तंड गणेश कोळसे यांच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या (Parbhani Crime) चोरट्यांनी परभणीसह इतर जिल्ह्यातुनही दुचाकी लंपास केल्या आहेत. बीड जिल्ह्यातून ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
यांच्या पथकाने केली कारवाई
दुचाकी चोरट्याला ताब्यात घेण्यात आले. पोनि. विवेकानंद पाटील, सपोनि. राजू मुत्तेपोड, पोउपनि. गोपिनाथ वाघमारे, अजित बिरादार, चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार विलास सातपुते, विष्णु चव्हाण, सिध्देश्वर चाटे, मधुकर ढवळे, राम पौळ, हनुमान डुबे, हुसैन पठाण, संजय घुगे, हनवते यांच्या पथकाने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत परभणी जिल्ह्यातील तीन आणि बीड जिल्ह्यातील एक असे चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरट्याने परभणी जिल्ह्याबरोबर इतर जिल्ह्यांमध्येही दुचाकी लंपास केल्या आहेत. इतर (Parbhani Crime) गुन्ह्यांविषयी तपास सुरू आहे.