परभणी/गंगाखेड(Parbhani):- अज्ञात चोरट्यांनी स्कुटी दुचाकीसह मोबाईल (Mobile)पळविल्याची घटना गंगाखेड परळी रस्त्यावर घडली. याप्रकरणी दि. १९ जुलै शुक्रवार रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील झोला (पिंप्री) येथील रहिवासी राम भानुदास जलाले यांचे कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी सध्या अंबाजोगाई येथे राहत असून दि. १६ जुलै रोजी ते अंबाजोगाई येथून गावी झोला (पिंप्री) कडे जाण्यासाठी स्कुटी दुचाकी क्रमांक एमएच २२ ए.के. ७१९३ वरून निघाले असता दुपारी ११ ते १२ वाजे दरम्यान ते गंगाखेड परळी रस्त्यावरील एका दुकानाजवळ थांबले असतांना अज्ञात चोरट्याने स्कुटी (scooty)दुचाकी चोरून नेल्याची व स्कुटीच्या डीक्कीतील ओप्पो कंपनीचा मोबाईल, पॅन कार्ड (PAN card)तसेच आधार कार्डच्या मूळ प्रती ही चोरीस गेल्याची फिर्याद पूजा राम जलाले रा. झोला (पिंप्री) ता. गंगाखेड ह.मु. मन्मत कॉलनी अंबाजोगाई यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून दि. १९ जुलै शुक्रवार रोजी रात्री उशिराने अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जमादार मुंजाभाऊ वाघमारे हे करीत आहेत.