परभणी(Parbhani) :- शहरासह जिल्ह्यात यंदाच्या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून उन्हचा पारा ४५ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद येथील वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम (Agricultural weather) सेवा विभागाने घेतली आहे.
रस्ते दुपारच्या वेळी निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले
शहरासह जिल्ह्याचे तापमान ४५ अंशावर पोहचल्यामुळे सामान्य जनजीवनावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील प्रमुख रस्ते, विविध बाजार रस्त्यावर वाहनांची, पादचार्यांची तुरळक गर्दी दिसून आली त्यामुळे अनेक रस्ते दुपारच्या वेळी निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले. मागील रविवार १२ मे रोजी शहराचे तापमाण ४४ अंशावर पोहचले होते. त्यात आज एका अंशाची भर पडून तापमाण यंदाच्या वर्षातील उच्चांकी पातळीवर म्हणजेच ४५ अंशावर पोहचले आहे. शहरात अधिच नागरीक वाढत्या तापमाणामुळे हैरान झाले आहेत. त्यात आता उन्हाची भर पडली आहे. त्यामुळे लहान बालकांसह ज्येष्ठ नागरीकांची(Senior citizens), महिला यांच्या आरोग्यावर वाढत्या उन्हाचा(summer) विपतरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.