चिखली (Buldhana) :- अचानकच वरीष्ठ पातळीवरुण मेरा बु शिवाजी हायस्कूलच्या प्राचार्य कावरे यांची सात महिन्यांतच बदली करण्यात आली आणि लगेच त्यांच्या जागेचा नव्याने प्राचार्य पदाचा पदभार इंगळे यांच्याकडे सपूर्द केला. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी (Students)व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कडक शिस्त न पाळणाऱ्यांना लगाम लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिवाजी हायस्कूलच्या प्राचार्य पदाचा घेतला इंगळे यांनी पदभार
चिखली तालुक्यातील मेरा बु येथे एकमेव पाचवी ते बारावी पर्यत श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (College)आहे . या विद्यालयात विद्यार्थांची पटसंख्या प्रमाणाच्या वरती असल्याने शिक्षक संख्या सुध्दा प्रमाणावर आहे. परंतु ११ वी आणि बारावी साठी एका शिक्षकाची कमतरता असल्याने विद्यार्थी व पालक शिक्षक देण्याची मागणी करत आहेत. अशा या मोठया हायस्कूल वर गेल्या सात महिन्या पासून कार्यरत असलेले प्राचार्य कावरे यांची वरिष्ठ पातळीवरुण अचानक बुलढाणा येथे बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागेवर लगेच वर्धा जिल्हयातील आंजी या हायस्कूल वरील इंगळे यांना मेरा बु चा प्राचार्य पदाचा पदभार सपूर्द केला. प्राचार्य पी एस इंगळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शाळेच्या वेळेत नियमित न येणाऱ्या शिक्षक भाऊसाहेबांच्या मनमानीला आता चांगलाच चाप लागणार आहे. त्यात अनेक शिक्षक वृंद शाळेच्या गणवेशात न येणे, मोबाईलचा वर्गात जास्त वापर करणे , शाळेच्या प्रार्थनेला उपस्थिती टाळने , असे प्रकार शिक्षकाकडून होत होते परंतु आता अशा शिक्षकांना चांगलाच लगाम बसणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
याबाबत प्राचार्य पी एस इंगळे यांनी सांगितले की विद्यार्थांची गुणवत्ता कशी वाढेल याकडे लक्ष दिल्या जाईल , तसेच जे पालक आपली मुले मुली महागड्या इंग्रजी शाळेत पाठवत आहेत अशा मुलांना गावातच दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असेल . यासाठी पालकांनी शाळेला सहकार्य करून आपली मुले मुली गावातच हायस्कूल मध्ये टाकावे जेणे करून आथिर्क भार सोसावा लागणार नाही असे दै देशोन्नती शी सांगण्यात आले .