चिखली (Buldhana) :- उप प्रादेशिक परीवहन अधिकारी (Transport Officer) बुलढाणा विवेक भंडारी, यांनी मेहकर फाट्यावरुन दे राजा कडुन येणारे अवैध रेतीने(Illegal sand) भरलेले चार ट्रक पकडले होते मात्र तहसिलदार यांनी गाडी पाहताच वाहन चालकांनी वाहने रोडवर रेती खाली करत फरार झाले. या चारही वाहनाचा तपास करून ५० हजाराचा दंड करण्यात आला.
उप प्रादेशिक परीवहन अधिकारी यांची कार्यवाही
मिळालेल्या माहितीनुसार उप प्रादेशीक परीवहन अधिकारी बुलढाणा विवेक भंडारी यांनी चारही ट्रक पकडले तेव्हा त्यांचा ट्रक आरटीओ पासींग (RTO Passing)नंबर व चेसेस नंबर घेतले होते त्यामुळे टिप्पर क्र एम एच २८ बीबी ८७०७ पंढरी मधुकर पवार रु. हर्णी पोस्ट उदय नगर ता चिखली, टिप्पर क्र एम एच २८ बीबी ७२०२ संदीप हनुमान गावड रु. घोटी हिवरा ता मेहकर , टिप्पर क्र एम.एच. २८ बीबी ७२४२ कार्तिक संतोष फलटनकर रा वार्ड नं ४ शिक्षक कॉलणी, मेहकर , टिप्पर क्र एम.एच. २८ बीबी ६०४० ज्ञानेश्वर रामेश्वर नवले रा. सुकळी ता मेहकर , वरील प्रमाणे चारही वाहन रात्री ९ वा वाजता मेहकर फाटा चिखली येथे दे राजा कडुन येणारे रोडवर, भानखेड शिवारात आढळून आले असून एका टिप्पर मध्ये ३ ब्रास रेती एकुन १२ ब्रास रेती एकुण किंमती ४८ हजार रुपये ची ची अवैध रेती चोरुन भरुन वाहतुक करीत असताना उपप्रादेशीक परीवहन विभागाचे टिमला मिळुन आले आहे. मात्र त्यांचा पाठलाग केला असता रस्त्याने सदर रेती टाकुन पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला. अशा तहसिलदार संतोष काकडे यांच्या तक्रारी वरुण चारही चालका विरुध्द बी.एन.एस, कलम 303,238,221, 3(5) सह महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम चे कलम 48 (7), 48(8) नुसार कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे .