वर्धा(Wardha):- सध्या सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचा रब्बी पिके पेरण्याचा हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना ओलिता करिता बोर धरणाचे पाणी दरवर्षी कालव्या मधून सोडण्यात येते अशातच गेल्या अनेक वर्षापासून धरणाचे (Dam)पाणी वाहून नेणाऱ्या कालव्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की त्यामधून पाणी वाहून जाताना अनेक अडचणी येऊन काही ठिकाणी हजारो लिटर पाण्याचा अपवय होऊन ते पाणी वाया जाऊन रस्त्यावरती येऊन शेतकऱ्यांचे पांदण रस्ते खराब होतात.
पाण्यामुळे बांधन रस्ते होतात खराब
त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers)मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होते असे असताना संबंधित विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते गेल्या अनेक वर्षापासून या कालव्याची दुरुस्ती झाली नसून कालव्याच्या आत मध्ये अनेक प्रकारचे झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले असून काही ठिकाणी कालव्याला मोठ मोठाले छिद्र पडून पाणी हे दुसरीकडे वाया जात आहे. कालव्याची दुरुस्ती मात्र होताना दिसत नाही त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते पाणी वाया जाऊ नये म्हणून कालव्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. याकडे संबंधित विभाग लक्ष देऊन कालव्याची दुरुस्ती करणार का हा मोठा प्रश्न असून वाया जाणाऱ्या पाण्याला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो.