चिखली (Buldhana) :- दिवाळी सणानिमित्त गावात विद्युत पोलवर लाईट लावण्याचे काम ग्रा. प. च्या माध्यमातून सुरू होते. तेव्हा गावातील एका शिक्षकाने लाईट केव्हा येणार यावरून जाणून बुजून सरपंच पतीला फोन लावून अश्लील भाषेचा वापर करून जीव मारण्याची धमकी दिली. अशा सरपंच पतीच्या तक्रारी वरुण अंढेरा पोलिसांनी जिल्हा परिषद (Zilla Parishad) शाळेतील एका शिक्षका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शेळगाव आटोळ येथे २ ऑक्टोबर रोजी घडली.
विद्युत पोलवर लाईट लावण्यासाठी विज वितरण विभागाची परवानगी घेवुन काम सुरू
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेळगाव आटोळ येथील २२ सदस्य संख्या असलेल्या ग्रा.प. सरपंच पदाचा कारभार गेल्या तीन तर साडेतीन वर्षांपासून वैदू समाजाच्या सौ सुरेखा सुरेश राजे यांच्याकडे आहे. सरपंच सौ राजे यांनी गावात नवरात्र उत्सव (Navratra Utsav) आणि दिवाळी उत्सव या निमित्याने गावातील विद्युत पोलवर लाईट लावण्यासाठी विज वितरण विभागाची परवानगी घेवुन काम सुरू होते . हे काम ग्रा. प. चे कर्मचारी करत होते . मात्र गावातील शिक्षक मार्तंड नारायण देशमुख यांनी ग्रा. प. सरपंच सचिव अथवा सदस्यांना फोन न लावता सरपंच पती सुरेश राजे यांना फोन लावला आणि फोनवर लाईट केव्हा येणार यावरून दारूच्या नशेत अश्लील भाषा(obscene language) वापरून जीव मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार सरपंच पती यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग केला आणि यावरून अंढेरां पोलीस स्टेशनला (Police Station)जावून रितसर तक्रार दाखल केली . या तक्रारी वरुण ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार यांनी आरोपी मार्तंड नारायण देशमुख यांच्या विरूध्द कलम ३५१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास बिट जमादार हे करत आहेत . तसेच या प्रकरणात पोलिसांनी योग्य कार्यवाही न केल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे न्यायाची मागणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.