परभणी(Parbhani) :- जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical relationship) ठेवत एका चाळीस वर्षीय महिलेवर अत्याचार(torture) करण्यात आला. ही घटना परभणी शहरातील साई कॉर्नर भागात घडली. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन ७ जुलै रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल(Filed a case) करण्यात आला आहे.
परभणी शहरातील नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल
पिडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पतीचे निधन झाल्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी महिला ही साई कॉर्नर भागात किरायच्या घरात राहत होती. काही महिन्यापूर्वी लेबर कार्ड(Labor Card) काढण्याच्या निमित्ताने महिलेची ओळख शेख शौकत शेख शरफोद्दिन याच्या सोबत झाली होती. ओळखीतील शेख शौकत हा महिलेला अधुन मधून फोन करुन बोलत होता. तसेच सोबत राहण्याविषयी तगादा लावत होता. याच दरम्यान ३० जून रोजी सकाळच्या सुमारास महिला एकटी असल्याचे पाहून शेख शौकत याने तिला जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने अत्याचार केला. घडला प्रकार कोणाला सांगितला तर तुला खतम करुन टाकतो, अशी धमकी दिली. या प्रकरणी नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
परभणी येथील साई कॉर्नर येथील घटना
पतीच्या मृत्यू नंतर मुलांच्या शिक्षणासाठी सदर महिला परभणी येथे साई कॉर्नर भागात किरायाच्या घरात राहत होती. ओळखीतील आरोपी तिला अधुन मधून फोन करुन तिला बोलत होता. तसेच आपण दोघे सोबत राहू असे म्हणत तगादा लावत होता. परंतु पिडितेने संबंधिताला नकार दिला.