कारंजा(Karanja):- दुचाकी चोरी (Bicycle theft)प्रकरणातील तीन आरोपींना शहर पोलिसांनी (City Police) जेरबंद केले आणि त्यांचे कडून 1 लाख 29 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. शहरातील टिळक चौकातील रहिवाशी अंकुश अनिलराव कऱ्हे यांनी एम. एच. 27 एम. 2554 क्रमांकाची अंदाजे 30 हजार रुपये किमतीची दुचाकी घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद 25 मे रोजी शहर पोलिसात दाखल केली होती.
आरोपीं जवळुन 1 लाख 29 हजार रुपये किमतीच्या चार दुचाक्या जप्त
त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.द.वि.च्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल (Filed a case)करून चोरट्यांचा शोध सुरू केला. यासाठी ठाणेदार दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात तपास पथक तयार केले आणि तपास पथकाने कसोशीने तपास(investigation) करुन गुप्त माहीतीचे आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेवुन चोरी गेलेली दुचाकी व आरोपींचा शोध घेवुन पवन परसराम जाधव वय 33 वर्ष रा. उंकर्डा ता. कारंजा ह.मु. अशोक नगर कारंजा, राजेश गौतम वर वय 32 वर्ष रा. इंदीरा नगर कारंजा व करन नारायन तळोसे वय 29 वर्ष रा. अशोक नगर कारंजा व एक विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेवुन आरोपीं जवळुन 1 लाख 29 हजार रुपये किमतीच्या चार दुचाक्या जप्त केल्या .
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधिक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी, पो.नि. दिनेशचंद्र शुक्ला यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड, गणेश जाधव, मयुरेश तिवारी, उमेशकुमार बिबेकर, अमित भगत, नितीन पाटील, गजानन शिंदे धंनजय भोयर यांनी केला असुन पुढील तपास गणेश जाधव करित आहे.