परभणी (Parbhani):- शहरातील मराठवाडा प्लॉट भागात तिर्रट जुगार खेळत बसलेल्या जुगार्यांवर नानलपेठ पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे साहित्य मिळून ३ लाख ५२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जुगार्यांवर नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला
पो.नि. चितांबर कामठेवाड, सपोनि. किनगे, सपोनि. सय्यद, पोलिस अंमलदार दवंडे, शोयब खान, सानप, भोसले यांच्या पथकाने कारवाई केली. पोलिसांना मराठवाडा प्लॉट येथील लक्ष्मीबाई मुसळे यांच्या घरात तिर्रट नावाचा जुगार चालू असल्याची माहिती मिळाली होती. सदर माहितीवरुन पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी आठ व्यक्ती गोलाकार बसुन जुगार खेळतांना मिळून आले. पोलिसांनी संबधीतांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस अंमलदार सुधाकर कुटे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेख मुख्तार, रसुल खान पठाण, मो. जावेद, सय्यद रफियोद्दीन, तवक्कल उर्फ बाबा खान, शेख मोसीन, मो. तौफीक, शेख जावेद, लक्ष्मीबाई मुसळे यांच्यावर गुन्हा(Crime) नोंदविण्यात आला आहे.