नाशिक(Nashik):- नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लहान मुलांना मारण्याचा कींवा हत्येचा हा पँटर्न सर्वांना चक्रावून टाकत आहे. विहिरीत कासव (turtle)असल्याचं सांगत तीन लहान चिमुकल्यांना ढकलून दिल्याची घटना उघडकीस आली. सिन्नर तालुक्यात वडगाव पिंगळाव येथे घटना घडली आहे. पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून अधिकचा तपास सुरू झाला आहे. मात्र जिल्ह्यातील या अनोख्या घटनेची गंभीर(severe) दखल पोलिसांनी घेतली आहे.
घाबरलेल्या पालकांनी तातडीने पोलिसांना घटनाक्रम सांगितला
अथर्व घुगे, वरद घुगे आणि आदित्य सानप अशी त्या चिमुकल्यांची नावे आहेत. त्यावेळी घटनास्थळावर असलेल्या अमोल लांडगे याने मुलांना विहिरीमधील कासव असल्याचं सांगत ते दाखवण्यासाठी विहिरीजवळ नेलं. तिथेच संशयित विक्रम माळी, साईनाथ ठमके आणि अमोल यांनी भरलेल्या विहिरीमध्ये तिन्ही मुलांना ढकलून दिले आणि तिथून पलायन केले. मुलांमधी एकाने विहिरीतील(well) मोटारीच्या दोरीला पकडलं आणि बाहेर येऊन इतर दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. भेदरलेल्या या तिघांनीही घरचे मारतील म्हणून सुरूवातीला घरी काही सांगितलं नाही. पण त्यांच्या ओल्या झालेल्या कपड्यांमुळे घरच्यांना संशय आला. मुलांना विश्वासात घेत त्यांनी काय झालं याबद्दल विचारल्यावर मुलांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. या घटनेमुळे घाबरलेल्या पालकांनी तातडीने पोलिसांना घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी अमोल लांडगे याला ताब्यात घेतलं असून दोन संशयितांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात आरोपीने मुलांना मारण्याचा प्रयत्न का केला? त्यांना मारण्याचा आरोपीचा हेतू काय होता? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने खळबळ उडाली असून गावात याची जोरदार चर्चा असून पोलीस संशयितांच्या मागावर आहेत.