औंढा नागनाथ (Lightning death) : तालुक्यात दिनांक 12 जून गुरुवार रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास झालेल्या विजेच्या कडकडाटासह पावसात वीज कोसळून पार्डी सावळी येथील शेतकरी विठ्ठल हरिभाऊ नागरे यांच्या दोन गाभण गाई तर दीनानाथ हरिभाऊ नागरे यांची एक गाभण गाय दगावल्या तर सुकापुर येथेही वीज कोसळून शेतकरी ज्ञानेश्वर खंडबाराव खटके यांची एक गाय दगावली आहे. सावळी पार्डी येथील तलाठी नवनाथ गोडसे तर सुकापुर येथील तलाठी गोपाल मुकीर यांनी (Lightning death) घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. सदरील दोन्ही घटनेत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे




