जडगाव (Hingoli):- औंढा नागनाथ तालुक्यातील जडगाव मध्ये कालपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) संपूर्ण परिसर जलमय झाला गावातील अनेकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसलं गावाला पुराने वेढा दिला.
जनावरांचा गोठ्यातच मृत्यू
अनेकांची जनावरे वाहून गेली तर अनेकांचे जनावरे गोठ्यातच मृत्यू (Death)पावली. त्यातच श्री लव्हेंकर यांचे बैल वाहून जात असताना बैलाचा कासरा सोडण्यासाठी म्हणून ते पुरामध्ये उतरले बैलाचा कासरा तर सोडला, पण स्वतः मात्र पुराच्या बाहेर निघता येत नव्हतं. त्यांना वाचवण्यासाठी सोपान लवेकर आणि प्रवीण लवेकर हे दोघेजण गेले. परंतु तिघेही पुराच्या पाण्यात अडकून पडली चहू बाजूने पाणीच पाणी जीव मोठे धरून लिंबाच्या झाडावर चढली तब्बल तीन तास झाले. पुराचे पाणी काही कमी होताना दिसत नव्हते. या कालावधीमध्ये औंढा येथील तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असता एन डी आर एफ ची टीम नांदेड वरून येत असल्याचे त्यांनी सांगितले परंतु पाऊस परत खूप जोरात सुरू झाल्यामुळे वाट पाहणे म्हणजे जीवाला धोका असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले तेव्हा गावातील श्री बाबाराव पडोळे यांनी हिम्मत करून दोरीच्या साह्याने पुरामध्ये उडी घेऊन झाडावर अडकलेल्या तीन शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचले आणि तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर तीनही शेतकऱ्यांना त्यांनी हिमतीने पोहून बाहेर काढले.
आज श्री बाबाराव पडोळे यांनी दाखवलेले हिंमतीची आणि पराक्रमाची चर्चा संपूर्ण गावामध्ये चालू आहे. असा वीर हा जाहला तीन शेतकऱ्यांचा जीव वाचवला.