८६.०५२क्युमेक्स नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
कळमनुरी (Isapur Dam) : ईसापुर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर ईसापुर धरणाचे (Isapur Dam) तीन वक्र दरवाजे उघडण्यात आले. यातुन ८६.०५२क्युमेक्स धरणातील पाणीसाठा पेनगंगा नदी पात्रात सोडण्यात येत असुन पाण्याची आवक पाहुन पाण्याचा विसर्ग वाढ किंवा कमी करण्यात येणार असुन नदी काठावरील गावांनी खबरदारी घेण्याचे आवाहन ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अ.बा. जगताप व व्यवस्थापक उपविभागीय क्रं१ चे उपविभागीय अभियंता एच. एस. धुळगंडे यांनी केले आहे.
ईसापुर धरणात ९७.३२टक्के पाणीसाठा
मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेल्या (Isapur Dam) ईसापुर धरणाच्या पाणी पातळी मध्ये लक्षणीय वाढ झाली असून सध्या धरणाची पाणी पातळी ४४०.७३ मीटर झाली असून सध्या धरणात ९३८.३१ दलघमी इतका पाणीसाठा असुन ईसापुर धरण हे ९७.३२ टक्के भरले आहे.ईसापुर धरणातुन ८६.०५२ क्युमेक्स इतका विसर्ग पेनगंगा नदीपात्रात दि.७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता ईसापुर धरणाच्या सांडव्याचे वक्रद्वार क्रं २,८,१४ हे तीस सेंटीमीटर ने उघडून सोडण्यात आला असुन (Isapur Dam) धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे अथवा कमी करण्याबाबत वेळोवेळी निर्णय घेण्यात येणार असून संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये.
यासाठी पेनगंगा नदीकाठावरील गावातील नागरिकांनी आपली गुरे-ढोरे घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी ठेवावे व इतर कोणतीही जीवित हानी होऊ नये. यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अ.बा.जगताप व व्यवस्थापक उपविभागीय क्रं१ चे उपविभागीय अभियंता एच.एस. धुळगंडे यांनी केले आहे.