परभणी/सेलू (Parbhani):- शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr. Babasaheb Ambedkar)पुतळा परिसरात अँड.विष्णू ढोले हे मुस्लिम समाजास आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यासाठी ४ जुलैपासून उपोषणास बसले आहेत. गुरुवार ११ जुलै हा उपोषणाचा आठवा दिवस आहे. प्रशासनाने या उपोषणकर्त्याच्या सर्वच मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुस्लिम समाज (Muslim society) बांधवांच्या वतीने १० जुलै रोजी सेलुबंदचे आवाहन करण्यात आले होते. बंद दरम्यान आठवडी बाजार परिसरात अँड विष्णू ढोले यांच्या समर्थकाकडून जोर जोरात घोषणाबाजी करत पोलीसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे उपोषण करते अँड विष्णू ढोले सह इतर तीन समर्थकांवर १० जुलै रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे अँड विष्णू ढोले हे मुस्लिम समाजाच्या आरक्षण प्रश्नावर ४ जुलैपासून आमरण उपोषण (Fasting to death) करत आहेत. १०जुलै रोजी अँड विष्णू ढोले यांच्या समर्थकांनी सेलू बंदचे आवाहन केले होते.
आरक्षण; उपोषणाचा आठवा दिवस
त्या संबंधाने उपोषणकर्ते अँड विष्णू ढोले यांनी पोलिसांच्या आदेश झुगारून तसेच शेख साजिद शेख रहीम, मुताहीर खान मुनवर खान आणि अनिकेत सूर्यकांत रायबोले यांना चिथावणी देऊन सेलू शहर बंद करण्यास सांगितले तेव्हा उपोषण करते अँड विष्णू ढोले यांच्या सांगण्यावरून आठवडी बाजार सेलू परिसरात पोलीसांनी कायदेशीर रित्या दिलेल्या आदेशाचे पालन न करता १० जुलै रोजी सकाळी ११ ते १२:३० दरम्यान जोरजोरात घोषणाबाजी (Sloganism) करून दुकाने बंद करा असे आवाज देऊन गुन्हा करत असताना उभयतांना पोलीसांनी ताब्यात घेतले. पोलीस शिपाई प्रशांत कोकांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (Indian Judicial Code) अन्वये उपोषणकर्ते अँड विष्णू ढोले, शेख साजिद शेख रहीम, मुताहीर खान मुनवर खान आणि अनिकेत सूर्यकांत रायबोले या चार जणावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक व पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत.