एक गंभीर अवस्थेत
लेंडेझरी वनपरिक्षेत्र अंतर्गत आलेसूर-खापा-मांडवी जंगलातील घटना
तुमसर (Tigress Cub Death) : तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या आलेसुर – खापा -मांडवी बिट जंगलात एका पट्टेदार वाघिणीचा तीन महिन्याचा शावक मृतावस्थेत आढळून आला व दुसरा शावक अन्न पाण्याविना भुकेने व्याकूळ गंभीर अवस्थेत शारीरिक कमजोर असलेल्या स्थितीत आढळून आल्याची धक्कादायक घटना दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजतादरम्यान समोर आली. सदर घटनेने (Tigress Cub Death) वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेच्या दिवशी लेंडेझरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येथील वनकर्मचारी गस्तीवर असतांना आलेसुर – खापा – मांडवी रिट बिटात एक तीन महिन्याचा वाघिणीचा शावक मृतावस्थेत आढळून आला तर (Tigress Cub Death) दुसरा शावक बाजूला भुकेने व्याकूळ झालेल्या गंभीर स्थितीत आढळून आल्याने वनविभागत एकच खळबळ उडाली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लेंडेझरी वनपरिक्षेत्र अधिकारी वैद्य व कर्मचारी दाखल होताच (Tigress Cub Death) मृत शावकाला ताब्यात घेतले, तर दूसर्या गंभीर अवस्थेत असलेल्या शावकाला नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाष्ठ निष्काषण अधिकारी रितेश भोंगाडे, लेंडेझरी वनपरिक्षेत्र अधिकारी वैद्य करीत आहेत.