परभणीतील गंगाखेड न्यायालयाचा निकाल
परभणी/गंगाखेड (Gangakhed Courts) : धनादेश अनादर प्रकरणी गंगाखेड न्यायालयाने (Gangakhed Courts) दगडवाडी येथील एकास तीन महिने शिक्षा ठोटावत दहा हजार रुपये दंडाचा आदेश नुकत्याच दिलेल्या निकालात दिला आहे.
तालुक्यातील दगडवाडी येथील राठोड पंडीत गोपीनाथ याने बीड अर्बन को-आॅप क्रेडीट सोसायटी बीड गंगाखेड शाखेकडुन दिड लाख रुपये कर्ज घेतले होते. थकीत कर्जाच्या परतफेडीसाठी त्याने बॅकेस ४४ हजार रुपायाचा धनादेश दिला. परंतु बँकेस दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी बँकेने राठोड पंडीत गोपीनाथ याच्याविरुद्ध (Gangakhed Courts) न्यायालयात कलम १३८ एन.आय अॅक्ट प्रमाणे फौजदारी (Gangakhed Crime) प्रकरण दाखल केले.
या प्रकरणात २ रे प्रथम वर्ग न्यायाधीश (Gangakhed Courts) यांनी सखोल चौकशी करत फिर्यादी बॅकेच्या वतीने दाखल केलेल्या साक्षी पुराव्याचा व बॅकेच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी राठोड पंडीत गोपीनाथ रा. दगडवाडी यास तीन महिने शिक्षा ठोठावली व नुकसान भरपाई पोटी बँकेस १० हजार रुपये दंड देण्याचा आदेश दिला. या (Gangakhed Crime) प्रकरणात अँड. बी.एस.मुंढे यांनी बँकेच्या वतीने काम पाहिले. बीड अर्बन को-आॅप क्रेडीट सोसायटी लि. बीड गंगाखेड शाखेचे संदीप पालमकर यांनी त्यांना सहकार्य केले.