वाळू माफिया व मजुर मात्र घटनास्थळावरून पसार..?
परभणी/गंगाखेड (Parbhani Revenue Action) : पोलीस प्रशासनाने सोमवार रोजी केलेल्या कार्यवाहीत सहा तराफे नष्ट केल्यानंतर सोमवार 13 मे रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास महसूल प्रशासनाने (Parbhani Revenue Action) मसला येथे केलेल्या कार्यवाहीत तीन तराफे जाळून नष्ट केले आहे. फरार वाळू माफिया व मजुरावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांतून होत आहे.
गोदावरी नदी पात्रात विनापरवाना होत असलेले अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी सोमवार 13 मे रोजी गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली (Parbhani Revenue Action) तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सुनील कांबळे, नायब तहसीलदार अजीम सरवर, नायब तहसीलदार अशोक केंद्रे, सहायक महसूल अधिकारी वैजनाथ फड, मंडळ अधिकारी शंकर राठोड, मंडळ अधिकारी यशवंत सोडगीर, ग्राम महसूल अधिकारी रमेश लटपटे, शिपाई अर्जुन आघाव, संतोष भारसाकळे, महसूल सेवक एकनाथ शहाणे, लिंबाजी चाटे, नरसिंग चाटे, गुरुलिंग रेवडकर, कृष्णा सोडगीर आदींनी मसला येथील गोदावरी नदी पात्रात असलेले तीन ताराफे जाळून नष्ट केले आहे.
या कार्यवाही दरम्यान अवैध रित्या वाळू उपसा करणारे वाळू माफिया व मजुर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. फरार झालेल्या वाळू माफियांसह मजुरांची माहिती घेत (Parbhani Revenue Action) महसूल प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांतून होत आहे.




