चिखली (Buldhana) :- मागील तीन महिन्यापूर्वी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट होवून दमदार पाऊस (Rain)पडला त्यांमध्ये विज पडून अनेक जनावरे दगावली होती . या पशुपालकांना मदत म्हणून आ. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी नैसर्गिक आपत्ती व्यस्थापन विभागांच्या माध्यमातून चिखली तालुक्यातील ९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली .
चिखली तालुक्यात यावर्षी मृग नक्षत्रात जून जुलै मध्ये मेघ गर्जनासह वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस पडला. त्यांमध्ये अनेक ठिक ठिकाणी मोठे नुकसान (damage) होवून मोठया संकटाला सामोरे जावे लागले . मात्र झालेले नुकसान भरपाई मिळावी यासाठी अनेक कागदपत्रे जमा करूनही शासनाकडून पाहिजे तेवढी नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे शेतकरी शासनाच्या मदतीकडे दुर्लक्ष करतात. परंतु ज्या शेतकऱ्यांची जनावरे विज पडून मृत्यू मुखी पडली होती असे पशु पालकांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांच्याकडे नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणी केली. शेतकऱ्यांवर ओढवले संकट पाहून लगेच आ डॉ राजेंद्र शिंगणे याच्याकडे पाठपुरावा करत तहसिलदार यांच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून चिखली तालुक्यातील रोहडा येथील राजेन्द्र नामदेव बुरकुल यांचा एक बैल व मलगी येथील लीलाबाई साप्ते यांचा बैल व शेषराव पवार यांची एक म्हैस व इसरुळ येथील शेषराव गिरी यांची एक म्हैस हे पशुधन मृत पावले होते. या पशू पालकांना मदत मिळून दिली. त्यामुळे पशू पालकांच्या चेहऱ्यावर आनंदांचे वातावरण पहायला मिळत आहे .