उद्या मानोऱ्यात बंजारा समाजाच्या एकत्रीकरणासाठी परिवर्तन मेळावा
मानोरा (Banjara Samaj) : कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघात (Karanja-Manora constituency) बहुसंख्य बंजारा समाज असताना देखील सत्तेपासून दूर आहे. सत्तेपासून कोसो दूर असलेल्या बंजारा समाजाच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा समाजाला एकत्र करण्यासाठी (Banjara Samaj) बंजारा समाज परिवर्तन मेळाव्याचे आयोजन मानोरा येथील ठाकरे मंगल कार्यालय येथे दुपारी ४ वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बंजारा समाजातील अनेक ज्येष्ठ मान्यवर तसेच महंत या सहभागी होणार आहेत. तरी तालुक्यातील समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक देवराव राठोड, मखराम पवार, माजी सरपंच महादेव चव्हाण व बिल्डर अशोकराव जाधव यांनी केले आहे.
या मेळाव्यात (Banjara Samaj) बंजारा समाजाचे महंत, प्रतिष्ठीत नागरीक व जन संघर्ष संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. वर्षा राठोड हे मार्गदर्शन करणार आहेत. मतदार संघात बंजारा समाज हा बहुसंख्य असताना देखील समाजाचा प्रत्येक घटक हा विकासापासून कायम दूर राहिला आहे. समाज एकत्र आल्याशिवाय सत्तेचा वाटा मिळू शकत नाही. यासाठी समाजातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Karanja-Manora constituency) एकसंघ होऊन उमेदवार देण्याची तयारी समाज बांधवांनी केली केली असुन, त्यासाठी (Banjara Samaj) बंजारा समाज परिवर्तन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी मतदार संघातील बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.