परभणी(Parbhani) :- मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी गुरुवार १ ऑगस्ट पासून सकल मुस्लीम समाज (Muslim society) आरक्षण कृती समितीच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मुस्लीम समाजास शिक्षण, नोकर्यां मध्ये पाच टक्के आरक्षण बहाल करावे
महाराष्ट्रातील मुस्लीम समाजास शिक्षण, नोकर्यां मध्ये पाच टक्के आरक्षण बहाल करावे, मुस्लीम समाजासाठी मौलाना आझाद रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टीट्युटची स्थापना करावी, उच्च शिक्षणामध्ये(higher education) ५० टक्के सवलत शिष्यवृत्ती योजना सुरू करावी, मुस्लीम व अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा तयारी करीता अभ्यास केंद्राची स्थापना करावी, बेरोजगार युवक – युवतींना(Unemployed young men and women) रोजगार मिळवून देण्यासाठी मेळावे आयोजीत करावेत, कर्ज योजनांमध्ये रक्कमेत वाढ करावी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त विद्यापीठाची स्थापना करावी, पोलीस(Police), सैन्य व इतर भरती प्रशिक्षणासाठी मैदानांची व्यवस्था करावी आदी प्रमुख मागण्या सकल मुस्लीम समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आल्या आहे.