पेंढरी शिवारातील घटना
पेंढरी (Tiger Attack) : गोंडबोरी जवळ पेंढरी शिवारात वाघाने शेतातील गाय व बैलाला आपले भक्ष्य बनविले. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. जंगल सोडून शेत शिवारात वाघाचा (Tiger Attack) वावर वाढला असून, यामूळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, भिवापूर तालुक्यातील गोंडबोरी जवळील मौजा पेंढरी येथील सर्वे क्र. ४७/२ या शेतात पिडीत शेतकरी भाऊराव तरणकर यांनी काल सायंकाळी नेहमीप्रमाणे जर्सी गाय व बैल खुंट्याला बांधून ठेवले होते. आज सकाळी शेतात गेल्यावर त्यांना हे दोन्ही जनावरं मृतावस्थेत आढळून आले. मृतावस्थेतील दोन्ही जनावरांच्या शरीरावर (Tiger Attack) वाघाच्या हमल्याचे स्पष्ट निशान दिसून येत होते.
याबाबत वनविभागाला सुचना देण्यात आली. वन विभागाचे (Forest Department) वन सहाय्यक डी .टी चौधरी , वनरक्षक डी. व्ही. सुर्यवंशी, वनमजूर इस्तारी कलसकर, श्रीकृष्ण पाल यांनी घटना स्थळी धाव घेतली. पशु चिकीत्सकांच्या मदतीने पंचनामा तसेच शव विच्छेदन करण्यात आले. तसेच नुकसान भरपाई करीता १.४५ लाखाचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
यापूर्वीही वाकेश्वर येथे अशीच घटना घडली होती. उमरेड करांडला अभयारण्य झाल्यापासून जंगल सोडून शेत शिवारात (Tiger Attack) वाघाचा वावर सातत्याने वाढला आहे. हिवाळा व उन्हाळ्यात शेतकरी आपली जनावर ही शेतात तयार केलेल्या मांडवात अथवा शेतातील गोठ्यात बांधून ठेवतात. त्यामुळे अशा घटनांमुळे शेतकरी व शेतात काम करणाऱ्या मजूरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Forest Department) वनविभागाने यावर आळा घालण्याच्या दृष्टीने काहीतरी उपाय योजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.