भिवापूर (Tiger Attack) : तालुक्यातील मोखेबर्डी येथील एका शेतकऱ्याच्या अंगणातील झोपडीत बांधून असलेल्या तीन बक-यावर हल्ला (Tiger Attack) करून ठार केल्याची घटना उघडकीस आली. माहितीनुसार, भिवापूर पासून 10 किमी अंतरावर असलेल्या मोखेबर्डी येथील ओमप्रकाश रामदास धनविजय यांनी बक-यांना उन , पावसापासून संरक्षण मिळावे याकरिता घरासमोरील अंगणात झोपडी बांधून ठेवले होते. या झोपडीत बांधून असलेल्या तीन बकऱ्यावर वाघाने (Tiger Attack) मध्यरात्री अंदाजे दोन वाजताच्या सुमारास हल्ला करून तिन्ही बकऱ्याला घटनास्थळी ठार केले. यापैकी एका बकरीला वाघाने सोबत नेले.
सदर घटनेचा प्रकार आज दि 20 जुलै सकाळी 6 वाजता उघडकीस आली. सदरच्या घटनेची माहिती वनविभाग भिवापूर (Forest Department) यांना देण्यात आली असून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तुळशिदास शेंडे यांनी गरीब शेतकऱ्याचे ६० हजाराचे नुकसान झाले असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वनविभागाने (Forest Department) नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी केली.