तास कॉलनी परिसरात घटना, सर्च आपरेशन सूरु
भिवापूर (Tiger injured) : भिवापूर -उमरेड महामार्गावर तास कॉलनी परिसरातील ज्यूस फॅक्टरी समोरील शेताच्या दिशेने वाघ जखमी अवस्थेत जातांना नागरिकांना दिसल्याची माहिती आहे. वाघाला एका अज्ञात वाहनाने धडक देऊन जखमी (Tiger injured) केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.वनविभागाने सर्च आपरेशन सूरु केले असून बातमी लिहीपर्यंत वाघाचे पावलांचे ठसे दिसले. वाघ पाहण्यासाठी नागरिकांनी ज्यूस फॅक्टरी जवळ एकच गर्दी केली होती. मात्र वाघ दिसून आला नाही. त्यामुळे शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार आज दि.31)पहाटे 6 ते 7 वाजताच्या. सुमारास काही नागरिकांना वाघ जखमी अवस्थेत भिवापूर -उमरेड महामार्ग ओलांडून उत्तर दिशेने जातांना दिसला.ही बातमी शहरात वाऱ्याप्रमाणे पसरली. वाघ पाहण्यासाठी लोक ज्यूस फॅक्टरीच्या दिशेने जात होते. परंतू लोकांना वाघ पाहण्याचा योग आला नाही. जखमी अवस्थेत वाघ कुठे निघून गेला काहीच कळले नाही. (Tiger injured) वाघ जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळताच दक्षिण वन परिक्षेत्र उमरेड व नागपूर वन परिक्षेत्राचे बचाव पथक कर्मचाऱ्यांनी परिसराला भेट देऊन सर्च आपरेशन सूरु केले. त्यांना वाघाचे पावलांचे ठसे नवनिर्मित रेल्वे क्रॉसिंग च्या दिशेने दिसले. मात्र जखमी झालेला वाघ दिसून आला नाही.