१२ कॅमेर्याद्वारे उर्वरीत बछड्यांच्या हालचालीवर लक्ष
सिंदेवाही (Tigress Arrest) : वनपरिक्षेत्रा मधील सिंदेवाही उपक्षेत्रातील नियतक्षेत्र डोंगरगांव मध्ये १० मे ला कांताबाई बुधाजी चौधरी (६६), सारिका शालीक शेंडे (४९), शुभांगी मनोज चौधरी रा. मेंढा माल (३०) या महिला जंगलात तेंदूपाने गोळा करणे करीता गेल्या असता, कक्ष क्रमांक १३५५ मध्ये त्यांच्यावर झालेल्या (Tigress Arrest) वाघाच्या हल्ल्यात तिघींचाही दुर्देवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर घटनास्थळी त्वरीत कॅमेरा ट्रॅप व लाईव्ह कॅमेरा लावण्यात आले. त्याआधारे, (Tigress Arrest) वाघाचा मागोवा घेत घटनेस जबाबदार असणार्या वाघाची निश्चिती करून वाघीनीला दि. १३ मे २०२५ बेशुध्द करून जेरबंद करण्यात आले होते. पुढील उत्तरीय तपासणी करून सदर वाघीनीला डब्ल्यूआरसीटी गोरेवाडा येथे पाठविण्यात आले. त्यानंतर तिच्या सोबत असणार्या बछड्यांनाही जेरबद करण्याची मोहीम वनविभागानी सुरुच ठेवली असता दि. १६ मे २०२५ रोजी अजय मराठे, सशस्त्र पोलिस दल ता.अ. व्या.प्र. चंद्रपूर यांनी डोंगरगांव नियतक्षेत्रात कक्ष क. १३६० मध्ये डॉर्ट करून वाघीनीच्या १ नर बछड्याला बेशुध्द करून जेरबंद करण्यात आले आहे.
पुढील उत्तरीय तपासणी करण्यात येत आहे. सदर मोहीम सहायक वनसंरक्षक राकेश सेपट, एम. बी. चोपडे, पशुवैद्यकीय अधिकारी, डॉ. रविकांत खोब्रागडे, बायोलॉजीस्ट राकेश अहुजा यांचे मार्गदर्शनात सिंदेवाही वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांचे नेतृत्वात एन. टी. गडपायले, क्षेत्र सहायक, सिंदेवाही, पी. एस. मानकर, क्षेत्र सहायक, गुंजेवाही, के. डी. मसराम, चिकाटे, वनपाल, वाय. एम. चौके वनपाल, डी. आर. पेंदोर, वनपाल, ओ. व्ही. चहांदे, सचिन चौधरी, विवेक फुलझेले वनरक्षक सर्व, सिंदेवाही परिक्षेत्रातील वनरक्षक, पी आर टी सदस्य, वनमजुर, वाहन चालक सर्व यांनी सहकार्य केले.
सदर मोहीमेत ६२ वन कर्मचार्यांचे पथक परिसरात गस्त घालत असून (Tigress Arrest) वाघाचे सनियंत्रणाकरीता ६४ कॅमेरा ट्रॅप व ८ लाईव्ह कॅमेरे लावण्यात आले आहे. या कॅमेर्याच्या मदतीने वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात असुन सदर परिसरात घेतलेल्या मागोवा नुसार वाघीणीच्या ईतर बछड्याचा शोध घेवून वाघास जेरबंद करण्याची मोहिम सुरूच आहे.